Monday, January 26, 2009

शूरा मी वंदिले...

कालचा 'सा रे म प' चा कार्यक्रम पाहून मी थक्कं झालो. २६ जानेवारी निमित्त 'शूरा मी वंदिले' या नावाखाली हा कार्यक्रम झाला. अनेक क्रांतिकार्यांच्या कविता गीते प्रस्तूत करण्यात आली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी हा कार्यक्रम बसविला होता. वांग्मयातील त्यांचा तो गाढा व्यासंग, भाषेवरील प्रभूत्व, इतिहासाचा अभ्यास समज, कळकळ आणि राष्ट्रीय भावना पाहून सर्वच वीररसाने नाहून निघाले! वीरगति प्राप्त झालेल्या अनेक जवानांच्या वीरांच्या कहाण्या त्यांच्या संबंधीतांकडून ऐकून सर्वच शहारून गेले.

Sunday, January 18, 2009

न्याहारी

आजकाल रोज सकाळी एका अजबच दृष्याला मी अनायास श्रोता ठरतो. घरामागिल पसरलेल्या शेतांमध्ये उडालेल्या झुम्मडिचा! रोज सकाळी हिरव्यागार पोपटांचे थवेच्या थवे शेतावर उतरतात. लांबलचक, हिरवेगार, लाल चोचवाले, चंचल, जंगली पोपट! सुमारे ३००-४०० असावेत! पोपटांचा एवढा मोठा थवा यापूर्वी मी कधीही पाहिला नाही. शेतातील पेरू पिकायला लागल्याची गुप्त ख़बर त्यांना कुणी दिली, कुणास ठाऊक! हेच नाही तर ज्वारीचं हिरवं पीक आता सोनेरी दिसू लागलं आहे. कणसं उमलून त्यांतील टपोरे सोनेरी दाणे उन्हात लखलख चमकू लागले आहेत. यांचा मोह पोपटांना अनावर होणे साहजीक आहे.

शेत्कर्याची मात्र त्रेधा-तीर्पिट उडाली आहे. भल्या पहाटे तो गोफण धरून सावरा-बावरा धावतांना दिसतो. दीवसभर बिचारा मचाणावर बसून गोफण फिरवित असतो...

उन्हं चढू लागली की पोपट निघून जातात. मग मावळत्या संध्येची शेतावरील जादू काही औरंच असते...

सोनेरी कणसांवर एक लाल्सट छठा चढ़ते आणि वाहणार्या मंद झुळूकांवर शेत नागासवे डोलू लागते! क्वचि
कधीतरी संध्याकाळी शेतकर्यांची मुलं छोटीशी शेकोटी पेटवतात कोवळा हुरडा भाजायला घेतात. त्या आगीत त्या मावळत्या उन्हात झळाळणारे त्यांचे ते हसरे चेहरे त्यांची ही न्याहारी, पोपटांच्या न्याहारीत्कीच प्रेक्षणिय असते!

Saturday, January 17, 2009

नववर्षाची संकल्पना...

३१ डिसेंबर २००९ च्या आत हे गीत आत्मसात (तोंडपाठ) करायचंच - :-)

राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥
कालिंदी-तट-पुलिंद-लांच्छित सुरतनुपादारविंद, जयजय ॥

उद्‌धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय ॥


गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर - शरद जांभेकर
नाटक - संगीत सौभद्र (१८८२)
राग - यमन (नादवेध)
ताल -
चाल - विठाबाई माउली