कालचा 'सा रे ग म प' चा कार्यक्रम पाहून मी थक्कं झालो. २६ जानेवारी निमित्त 'शूरा मी वंदिले' या नावाखाली हा कार्यक्रम झाला. अनेक क्रांतिकार्यांच्या कविता व गीते प्रस्तूत करण्यात आली. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी हा कार्यक्रम बसविला होता. वांग्मयातील त्यांचा तो गाढा व्यासंग, भाषेवरील प्रभूत्व, इतिहासाचा अभ्यास व समज, कळकळ आणि राष्ट्रीय भावना पाहून सर्वच वीररसाने नाहून निघाले! वीरगति प्राप्त झालेल्या अनेक जवानांच्या व वीरांच्या कहाण्या त्यांच्या संबंधीतांकडून ऐकून सर्वच शहारून गेले.
I gotta be me
6 years ago
No comments:
Post a Comment